ब्रिटनमध्ये साखरेच्या दरात ‘चिंताजनक’ वाढ

लंडन : ब्रिटनमध्ये साखर, दुध आणि पास्तासारख्या खाद्य पदार्थांच्या किमती एप्रिल महिन्यात जवळपास ४५ वर्षांमध्ये सर्वाधिक गतीने वाढल्या आहेत. बीबीसीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ज्या गतीने किराणा वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, त्याची गती एप्रिलमध्ये किरकोळ स्वरूपात धिमी झाली. मात्र, पुन्हा आता उच्चांकी स्थितीजवळ किमती पोहोचल्या आहेत. गेल्या १८ महिन्यात महागाईच्या दरातही वाढ झाली आहे. भोजन आणि ऊर्जेच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य लोकांवर आर्थिक ताण जाणवू लागला आहे. एप्रिल महिन्यातील महागाई मार्चमधील १०.१ टक्क्याच्या तुलनेत ८.७ टक्के होती. मात्र, वर्षभरात हा दर ८.२ टक्क्याच्या वर राहिला आहे. जर्मनीत ७.६ टक्के, फ्रान्समध्ये ६.९ टक्के आणि अमेरिकेत ४.९ टक्के अशा इतर प्रगत देशांच्या तुलनेत ब्रिटनमधील महागाईचा दर अधिक आहे.

मात्र, याचा अर्थ किमती घसरत आहेत असे नाही. या फक्त कमी गतीने वाढत आहेत. युक्रेन हा धान्य आणि सूर्यफुलाचा मोठा उत्पादक आहे. त्याचा वापर जेवणापासून तेल, पशुखाद्य अशा प्रत्येक गोष्टीत केला जातो. युद्धामुळे युक्रेनचे शिपमेंट विस्कळीत झाल्याने घाऊक अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तर खराब हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बिटसह इतर काही भाजीपाल्याचाही समावेश आहे. अन्नधान्याच्या किमती उच्चांकी दराने वाढल्या आहेत. तर धान्य, मासे, दूध आणि अंडी यांसारख्या पूरक धान्याच्या किमती थोड्या कमी गतीने वाढल्या.

महागाईचा दर अद्यापही बँक ऑफ इंग्लंडच्या २ टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा चार पट आहे. आणि याच्याशी लढण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत १२ वेळा व्याज दरात वाढ करण्यात आली. मार्च महिन्यानंतर बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर वाढविण्याची गती कमी केली. मात्र, बुधवारी महागाईच्या दरामुळे गुंतवणुकदारांना वर्ष अखेरीपर्यंत व्याज दर आणखी वाढून ५.५ टक्के होतील अशी धास्ती वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here