शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याच्या 3 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन


अकलूज :
 येथील माळशिरस तालुक्यातील शंकर नगर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 चा ऊस गळीत हंगाम 24 नोव्हेंबर रोजी सुरु झाला. आज अखेर 3 लाख 18 हजार 240 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 3 लाख 16 हजार 150 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या 3 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन संचालक भिमराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचा सरासरी साखर उतारा 10.23 टक्के व आजचा साखर उतारा 11.25 टक्के आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये बुधवार (दि. 8) अखेर 2 कोटी 80 लाख 68 हजार 538 युनीट वीज निर्माण केलेली आहे. डिस्टीलरीमध्ये 26 लाख 83 हजार 692 लिटर्स रेक्टिफाईड स्पिरीट तसेच 14 लाख 34 हजार 432 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, विजय माने-देशमुख, विजय पवार, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, रावसाहेब पराडे, सुरेश पवार, माजी संचालक रामचंद्र चव्हाण, मोहन लोंढे, मारुती घोडके, अमरसिंह माने-देशमुख, सर्व सभासद, विभाग प्रमुख, कामगार युनियन, प्रतिनिधी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here