महागाईपासून दिलासा नाहीच, मार्चमध्ये घाऊक महागाईचा दर १४.५५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर चार महिन्यांच्या उच्च स्तरावर १४.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या दरात आणि कमोडिटीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईच्या दर वाढला आहे. मात्र, मार्च महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत घट दिसून आली आहे. सोमवारी जारी झालेल्या सरकारी डेटानुसार, एप्रिल २०२१ पासूनच्यासलग १२ व्या महिन्यात महागाईचा दर दोन अंकी बनला आहे. गेल्या वेळी नोव्हेंबर २०२१ मध्ये महागाईचा दर १४.८७ टक्क्यांवर पोहोचला होता.

याबाबत झीबिझ डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी २०२२ मध्ये WPI आधारित महागाईचा दर १३.११ टक्के होता. तर गेल्या वर्षी मार्च २०२१ मध्ये हा दर ७.८९ टक्के इतका राहिला. मार्च महिन्यात खाद्य पदार्थांमधील महागाई ८.१९ टक्क्यांवरुन घटून ८.०६ टक्के झाली. तर भाजीपाल्याचा महागाईचा दर २६.९३ टक्क्यांपासून १९.८८ टक्क्यांवर आला आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठ्याची साखळी अडचणीत आली आहे. त्यामुळे कच्चे पेट्रोलियम, नॅचरल गॅस, खनिज तेल, बेसिक मेटल आदींच्या किमतीत वाढ झाली आहे. मॅन्युफॅक्चर्ड वस्तूंच्या महागाईचा दर फेब्रुवारीमधील ९.८४ टक्क्यांच्या तुलनेत १०.७१ टक्के होता. तर फ्युएल, पॉवर बास्केटमधील महागाईचा दर ३४.५२ टक्के राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here