बंद कारखाना सुरु करण्यासाठी पोस्टकार्ड लिहा अभियान सुरु

125

केशवरायपाटन, राजस्थान: सहकारी साखर कारखाना सुरु करण्याच्या मागणीबाबात शेतकरी युवा समन्वय समितीकडून सुरु करण्यात आलेल्या आंदोलना अंतर्गत बुधवारी पोस्टकार्ड अभियान सुरु करुन मुख्यमंत्र्यांच्या नावाने शेतकर्‍यांनी तसेच भागातील नागरीकांनी पोस्टकार्ड लिहिली आहेत.

कार्यक्रमाचे संयोजक नमन शर्मा यांनी सांगितले की, सकाळी 11 वाजता पाण्याच्या टाकी खाली स्टॉल मांडून कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड लिहा अभियान सुरु केले. अभियाना अंतर्गत 500 पोस्टकार्ड लिहिण्यात आली. समिती सदस्य गिर्राज गौतम यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला कारखाना क्षेत्रातील सर्व गावात पोचवले जाईल,आणि या भागातील सर्व गावातील शेतकरी, युवा हजारोंच्या संख्येने पोस्टकार्ड लिहून राजस्थान सरकारकडून साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी करतील. समिती सदस्य नवीन श्रृंगी यांनी सांगितले की, या अभियानानंतर गावामध्ये जनजागरण यात्रेचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमामध्ये सूरजमल नागर, शुभम शर्मा, मनीष राठोड, कृष्ण मुरारी गोस्वामी, रुप शंकर सैनी, लखन वैष्णव, लोकेश गौतम, हरीश प्रजापति, अर्जुन बैरवा यांनी सहभाग घेतला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here