यमुनानगर : Saraswati Sugar Mills कडून या हंगामात लवकर ऊस गाळप सुरू

यमुनानगर : सरस्वती साखर कारखान्याने (Saraswati Sugar Mills) ऊस गाळप सुरू केले आहे. या हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत एक आठवडा आधीच याची सुरुवात झाली आहे. गाळप लवकर सुरू झाल्याने शेतकरी आपल्या शेतातील ऊस तोडणीनंतर जवळपास २५,००० एकरमध्ये गव्हाची पेरणी करू शकतील. यावर्षी आतापर्यंत ऊस दर जाहीर झाला नसल्याने शेतकरी सरकारबाबत नाखूश आहेत. शेतकऱ्यांनी या हंगामात किमान ४०० रुपये प्रती क्विंटल ऊस दर देण्याची मागणी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ऊस उत्पादन खर्च वाढून प्रती एकर १५,००० रुपये झाला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर्षी उसाला किमान ४०० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची गरज आहे.

SSM चे मुख्य व्यवस्थापन अधिकारी एस. के सचदेवा यांनी सांगितले की, कारखान्याने गेल्यावर्षी १६२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. तर यंदा १७५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कारखान्याचे ऊस विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डी. पी. सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी ४४ ऊस खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. कामगारांची समस्या सोडविण्यासाठी ऊस खरेदी केंद्रांवर ३८ ऊस लोडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६७३ गावांतील जवळपास २२,००० शेतकऱ्यांकडून ९७,००० एकरात ऊस पिक घेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here