यशवंत कारखाना निवडणूक : शेतकरी पॅनलच्या उमेदवाराची अचानक माघार

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी पॅनेलकडून ‘ब’ वर्ग मतदारसंघातील अधिकृत उमेदवारी जाहीर झालेले संजय गायकवाड यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. गायकवाड यांनी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे उमेदवार सागर काळभोर यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केला.

पत्रकार परिषदेवेळी गायकवाड यांच्यासमवेत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर व अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे ‘ब’ वर्गातील उमेदवार सागर अशोक काळभोर आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, की स्वतःचे मतदेखील सागर काळभोर यांना देणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, कारखान्याच्या या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी पॅनलला जबर धक्का बसला आहे. पॅनेलच्या प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्वी उमेदवाराने गट बदलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here