पुण्यातील यशवंत साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन तुल्यबळ पॅनलमध्ये लढत

पुणे : हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दोन तुल्यबळ पॅनेल जाहीर झाली आहेत. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. आता ९ मार्च रोजी मतदान होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी, १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. गेली तेरा वर्षे बंद असलेला हा कारखाना सुरू करण्याचा कोण प्रयत्न करणार हा निवडणुकीत मुख्य मुद्दा ठरणार आहे.

राज्यातील एक नावजलेला सहकारी साखर कारखाना ते गैरकारभाराने बंद पडलेला कारखाना, असा यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रवास आहे. कारखाना बंद पडल्याने येथील शेतकऱ्यांचे फार हाल सुरू आहेत. २०१०-११ च्या गळीत हंगामात संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई झाली. त्यानंतर सलग १३ वर्षे कारखान्यावर प्रशासक आहेत. काही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन निवडणुकीचा आदेश मिळविला. त्यानंतर १५ वर्षानंतर कारखान्याची निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. पण ते असफल ठरले आहेत. आता कारखाना कोण सुरू करणार, कोणत्या पॅनेलकडे याची तयारी आहे हा मुख्य मुद्दा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here