देशातील अनेक राज्यांत पावसाचा कहर सुरू आहे. तर राजधानी दिल्लीत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर बेंगळुरुमध्ये पावसामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. दिल्लीत लोकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पुढील चार दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता नाही. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत चार जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत आज, ९ सप्टेंबर रोजी किमान तापमान २७ तर कमाल तापमान ३६ डिग्री राहील.
आजतकच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये किमान तापमान २५ तर कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सिअस राहील. लखनौत जोरदार पाऊस कोसळू शकतो. गाजियाबादमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारपासून पुढील चार दिवस यलो अलर्ट असेल. मुंबई, ठाणे, पुणे आणि काही जिल्ह्यांत हा अलर्ट लागू राहील. या काळात चांगला पाऊस पडेल. हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण छत्तीसगढ, तेलंगणा आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. तर बिहार, झारखंड, दक्षिण गुजरात आणि लक्षद्वीपमध्येही पावसाची शक्यता आहे.