महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शनिवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई हवामान केंद्राने वादळी वाऱ्यासह विजा कोसळण्याची शक्यता असल्याने अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गढचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही हलका पाऊस कोसळू शकतो असे सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने रविवारीही या जिल्ह्यांसह सोलापूर, हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर सातत्याने पाऊस पडत आहे. पावसाशी संबंधीत घटनांमध्ये आतापर्यंत १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील वायू गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांत चांगला ते मध्यम श्रेणीत नोंदवला गेला आहे. मुंबईत शनिवार कमाल ३२ तर किमान २६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान ढगाळ राहील. पुण्यात कमाल ३१ तर किमान २० डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हलक्या पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल ३३ तर किमान २५ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल ३० तर किमान २२ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हलक्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये कमाल ३२ तर किमान २१ डिग्री सेल्सिअस तापमान राहील.