कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

कोल्हापूर/औरंगाबाद : भारतीय हवामान विभागाने दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्हे आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात १ नोव्हेंबर आणि ३ नोव्हेंबर या कालावधीत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात २५-४५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सियसपर्यंत स्थिर राहील. तर किमान तापमान २१ अंश सेल्सियसपर्यंत घसरू शकते. आतापर्यंत चार महिन्यांच्या मान्सूनच्या कालावधीत या भागात ८० दिवस पाऊस झाला आहे. एपीजे अब्दुल कलाम अॅस्ट्रो स्पेस अँड सायन्स सेंटरचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, बंगालच्या खाडीवर पसरलेल्या चक्रीय स्थितीमुळे मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here