येस बँकेने अनिल अंबानी यांचे मुख्यालय ताब्यात घेतले

61

मुंबई: कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या रिलायन्स ग्रुपच्या अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का बसला आहे. 2,892 कोटींचे थकित कर्ज न भरल्यामुळे येस बँकेने अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (एडीएजी) सांताक्रूझ मुख्यालय ताब्यात घेतले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने थकीत रक्कम न भरल्यामुळे येस बँकेने दक्षिण मुंबईतील दोन फ्लॅट्स देखील ताब्यात घेतले आहेत.23 जून रोजी अनिल अंबानी यांनी 6,000 कोटी रुपयांचे कर्ज असलेली आर-इन्फ्रा या आर्थिक वर्षात पूर्णपणे कर्जमुक्त होईल असा दावा केला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here