ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी योग वर्ग

बीड : नव सूर्योदय सामाजिक संस्थेने अंथरवण पिंप्री या ठिकाणी सद्गुरु बंजारा आश्रमशाळेत योग व ध्यानाचे धडे देण्यात आले. पत्रकार विष्णू बुरगे यांच्या संकल्पनेतून नव सूर्योदय संस्थेच्या माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले. ग्रामीण भागातील शाळकरी मुला-मुलींना योग, ध्यान याचे धाडे मिळावेत आणि मूल्य शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने याचे आयोजन केले होते. ऊस तोडणी मजुरांच्या मुलांनी याचा लाभ घेतला.

मुलांना योग, ध्यान आणि मूल्य शिक्षणाची जोड मिळाली तर त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा मिळेल या उद्देशाने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसह आश्रम शाळांमध्येदेखील निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांना योगध्यान शिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांची मुले आई-वडिलांपासून दूर आश्रमशाळांत राहतात. त्याच्यात मूल्य शिक्षण रुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना या शिबिरांत संस्कृत श्लोक आणि संस्कृत शिक्षणाचेही धडे देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here