ऊस थकबाकीवरून योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

115

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. देशात अजारकता निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी तीन कृषी विधेयकांना विरोध केला जात आहेत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार असून त्यांचे उत्पन्न दुप्पट होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विरोधी पक्षांकडून विधानसभेच्या कामकाजात येणारे अडथळे आणि शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या आंआंदोलनप्रश्नी कामकाज रोखले जात असल्यामुळे नाराज होती. विधानसभेत विरोधी सदस्यांवर टीका करताना आदित्यनाथ म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकारने कायदे आणले. मात्र, विरोध त्यात राजकारण करून त्याच्या हिताला बाधा पोहोचवत आहेत. यातील अनेकांनी कृषी विधेयक वाचलेलेही नाही. ते आपल्या राजकीय फायद्यासाठी शेतकरी आंदोलनाआडून अराजकता निर्माण करीत आहेत. कोणताही मुद्दा सोडविण्यासाठी लोकशाहीमध्ये निश्चित प्रक्रिया आहे. पंतप्रधानांनी चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे. मात्र, तरीही विरोधक शेतकऱ्यांना भडकावत आहेत.
त्यांनी शेतकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशात सरकारने केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, जेव्हा लॉकडाउनमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद पडले होते, तेव्हाही आम्ही राज्यातील साखर कारखाने सुरू ठेवले. आमच्या पाठबळामुळे कोरोनासारखी महामारी असतानाही शेतकऱ्यांनी विक्रमी साखरेचे उत्पादन केले. इथेनॉल आणि सॅनिटायझरचे उत्पादन केले.

विरोधी पक्ष समाजवादी पार्टीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्ष ऊस थकबाकीबाबत विचारणा करतो. ही थकबाकी २०१३ पासून प्रलंबित आहे. मात्र, तेव्हा सत्तेवर कोण होते ? आम्ही ऊस थकबाकीतील १.२२ लाख कोटी रुपये दिले आहेत. २००४ ते २०१७ या कालावधीत जेवढे पैसे वाटले गेले, त्यापेक्षा अधिक पैसे आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here