गहू उत्पादक शेतकऱ्यांना योगी सरकारची भेट, गेल्या वर्षीपेक्षा ११० रुपये जादा दराने खरेदी

लखनौ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रती क्विंटल ११० रुपये दरवाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २१२५ रुपये प्रती क्विंटल दराने सरकारी खरेदी केंद्रावर गव्हाची विक्री करता येईल. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर बुधवारी किमान समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला. राज्यात सात सरकारी आणि सहकारी एजन्सींद्वारे ५९०० खरेदी केंद्रे यावर्षी ६० लाख क्विंटल गव्हाची खरेदी करतील.

लाईव्ह हिंदूस्थानमधील वृत्तानुसार, गेल्यावर्षी सरकारी खरेदी केंद्रांनी २०१५ रुपये प्रती क्विंटल दराने गव्हाची खरेदी केली होती. यावर्षी अन्न विभाग, उत्तर प्रदेश राज्य कृषी उत्पादन मंडई परिषद, उत्तर प्रदेश ग्राहक सहकारी संघ, उत्तर प्रदेश सहकारी संघ, उत्तर प्रदेश को-ऑपरेटिव्ह युनियन, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपण संघ आणि भारतीय अन्न महामंडळ यांच्याकडून गव्हाची खरेदी केली जाईल. सरकारच्या निर्णयानुसार या केंद्रांचे खरेदी उद्दिष्ट कमी अथवा जादा केले जावू शकते असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here