तुम्हीही वापरू शकता Digital Rupee, जाणून घ्या, अशी आहे प्रक्रिया

खिशात पैसे घेऊन जाणे हे आता जुने झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज, एक नोव्हेंबर पासून प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लाँच केला आहे. त्यामुळे आरबीआयची डिजिटल करन्सी प्रत्यक्षात अवतरली आहे. ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबर २०२२ ही तारीख यासाठी निश्चित केली. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आहे. तुर्त आरबीआय होलसेल ट्रँन्झॅक्शन आणि क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी डिजिटल रुपया वापरणार आहे.

आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, CBDC हे केंद्रीय बँकेने जारी केलेल्या नोटांचे डिजिटल रुप आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण बजेटमध्ये आर्थिक वर्ष २०२२-३ पासून ब्लॉक चेनवर आधारित डिजिटल रुपया सादर करण्याची घोषणा केली होती. वापरकर्त्यांसाठी ही अतिरिक्त सुविधा असेल. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, CBDC (डिजिटल रुपया) हे एक पेमेंट मीडियम असेल. नागरिक, व्यावसायिक, सरकार आणि इतरांसाठी कायदेशीररित्या त्याचा वापर केला जाईल. डिजिटल करन्सी आल्यानंतर तुम्हाला खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज नसेल. ही डिजिटल करन्सी तुम्हाला अकाऊंटमध्ये दिसू सकेल. मोबाईल वॉलेटप्रमाणे डिजिटल रुपया यूपीआयला जोडला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here