शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाबाबत आपचे साखर कारखान्यासमोर आंदोलन

आजमगड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकबाकीप्रश्नी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दि किसान साखर कारखाना सठियाव येथे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचा आरोप केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ६० कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी त्वरीत द्यावी अशी मागणी करण्यात आली. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

आपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश यादव म्हणाले, आजमगडमध्ये उद्योग धंदे उद्ध्वस्त झाले आहेत. कृषीप्रधान जिल्हा असून मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिले न मिळाल्याने अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या मुलांची लग्ने, औषधे, उपचार यासाठी पैशांची गरज आहे. मात्र, स्वतःला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. आजमगडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ६० कोटी ३० लाख रुपये सरकारकडे थकीत आहेत. मात्र, सरकार हे पैसे मिळवून देत नसल्याने कोंडी झाली आहे. आम आदमी पक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी लढाई करेल. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.
जिल्हाध्यक्ष रविंद्र यादव यांनी सरकार केवळ धनदांडग्यांकडे लक्ष देत असल्याचा आरोप केला. आगामी १५ दिवसांत सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

मुबारकपूर विधानसभा प्रमुख संजय यांनी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. जिल्हा महासचिव इसरार अहमद, जिल्हा कोषाध्यक्ष उमेश यादव, हरेंद्र यादव, अॅड. भरत यादव, रामकृष्ण यादव, रामप्रकाश, संतोष सिंह, संतोष यादव, महेंद्र सिंह, अजय यादव, अरुण कुमार सिंह, सुदामा यादव, रमाकांत, ऋषिकेश, लाल धर राम, उदय भान यादव, अशोक सिंह, अशोक यादव बिहारी, रामाश्रय, सुधीर, सुजीत, मुन्ना दुबे, विशाल, दीपक कुमार आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here