तामिळनाडू : सलेम येथे १५ टन साखर जप्त

सलेम : अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुळात मिसळण्यासाठी आणण्यात आलेली १५ टन सफेद साखर जप्त केली आहे. एका गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हा निर्देशित अधिकारी कथीनराव यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी सकाळी गूळ उत्पादन युनिटची पाहणी केली. त्यांना कमलापूरम येथील एका फर्ममध्ये लॉरी जाताना दिसली. अधिकाऱ्यांनी लॉरीची तपासणी केली. त्यामध्ये शेवा पेट येथील एका खासगी फर्मसाठी लोड केलेली साखर आढळली. ही साखर कमलापूरम येथे गुळात मिश्रण करण्यासाठी उतरवण्यात येत होती.

अधिकाऱ्यांनी ५.४० लाख रुपये किमतीच्या लॉरीसह १५ टन साखर जप्त केली आहे. डॉ. कथीनराव यांनी सांगितले की, खासगी फर्मच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील. गेल्या एक महिन्यात आमच्या विभागाने गुळात मिश्रण केली जाणारी ३६.८५ टन साखर जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या साखरेची किंमत १३.४८ लाख रुपये आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here