Sakuma Exports Limited कडून उत्तर पूर्व, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये साखर पुरवठ्यासाठी १५० कोटींचा करार

कोलकत्ता : सकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडने (Sakuma Exports Limited) ईशान्य, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये साखरेच्या पुरवठ्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा करार केल्याची माहिती एक्सचेंजला दिली आहे. सकुमाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या कार्याचा विस्तार करण्याच्या आणि या प्रदेशातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने उत्तर भारतात अशाच प्रकारच्या संधींचा सक्रियपणे शोध घेत आहोत. या माध्यमातून साखरेची वाढती मागणी पूर्ण करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला विश्वास आहे की या घडामोडीतून केवळ आमच्या वाढीस मदत मिळणार नाही तर आमच्या भागधारकांसाठी मूल्यदेखील निर्माण होईल. शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या आणि कृषी-वस्तू क्षेत्रातील आघाडीचे घटक म्हणून आमचे स्थान मजबूत करणाऱ्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. कंपनीने केलेल्या फाइलिंगनुसार, केजरीवाल शुगर एजन्सीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंत्राट देणारी संस्था आहे. या कराराचे पालन करण्याचा कालावधी तीन महिन्याचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here