कादवा साखर कारखान्याकडून ३ लाख ५० हजार लिटर इथेनॉल उत्पादन : चेअरमन श्रीराम शेटे

नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या पहिल्या इथेनॉल टँकरचे वितरण हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला करण्यात आले आहे. त्या टँकरचे पूजन चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते करण्यात आले. कारखान्याने केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार ३ लाख ५० हजार लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. पेट्रोलियम कंपनीकडे त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.

चेअरमन श्रीराम शेटे म्हणाले की, कादवाला ३५०० गाळप क्षमतेचा परवाना मिळालेला असून कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असल्याने गाळप क्षमता करण्याचा विचार करावा लागेल. कारखान्याने भविष्याचा वेध घेत इथेनॉल प्रकल्प हाती घेत सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे कारखान्याचा फायदा होत आहे. कारखान्याचा बायोगॅस प्रकल्प सुरू झाला असून त्यामुळे बगॅस बचत होणार आहे. कंपोस्ट खत निर्मिती झाली असून त्याचे वितरण सुरू झाले आहे. सभासदांना उधारीत खत वाटप केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here