भैरवनाथ शुगरकडून ४ लाख ३० हजार क्विंटल साखर उत्पादन

धाराशिव : येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता सखी धनंजय सावंत यांच्या हस्ते पूजन करून झाली. कारखान्याने १६ व्या गळीत हंगामात ४ लाख ९० हजार टन ऊसाचे गाळप केले. एकूण ४ लाख ३० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असून कारखान्याने २० जानेवारीपर्यंतच्या उसाला २७२५ दर दिला. तर २१ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान गाळप करण्यात आलेल्या ऊसाला २८०० रुपये दर दिला. १५ मार्चनंतर गाळप बंद होईपर्यंतच्या उसाला प्रती टन २९२५ रुपये दर देण्यात आलेला आहे.

सांगता समारंभावेळी वजनकाटा स्थळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य शेती अधिकारी भगवान काळे, चीफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र काळे, चीफ केमिस्ट्री दादा बोरकर, हेड टाईम कीपर सुरेश साळुंखे, बिसलरी मॅनेजर अजित भोसले, ज्येष्ठ अकाउंटंट बाळासाहेब धुमाळ, गोडाऊन कीपर श्रीकृष्ण झिरपे, सुपरवायझर अमोल कदम, केनयार्ड सुपरवायझर नीलकंठ बालगुडे, ऊस पुरवठा अधिकारी गणेश गरदडे, ऊस विकास अधिकारी अशोक हांगे, सोमनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here