लखनऊ : राज्य मुख्यालय प्रदेशात टोळ दलाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहून राज्यातील ऊस विकास विभाग सक्रिय झाला आहे. विभागातील एकूण 437 पथके यावेळी सक्रियपणे काम करत आहेत. विभागाचे अपर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, विभागीय अधिकार्यांनी साखर कारखान्यांच्या सहयोगाने 1,256 हेक्टर क्षेत्रफळामध्ये बचावासाठी उपाय केले आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना सातत्याने गावांमध्ये भ्रमण करुन कीटकांच्या आक्रमणांना विफल करण्यासाठी शेतकर्यांना जागरुक राहणे आणि पुरेशी सावधानी बाळगण्यासाठी जागरुक केले जात आहे. टोळांपासून बचावासाठी फवारणी टँकरमधून कीटकनाशक फवारणी, हैंडबिल वितरण, दैनिकांमधून टोळांपासून बचावासाठीच्या उपायांचा प्रसार केला जात आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.