साखर कारखान्यातील पाच कर्मचाऱ्यांसह 26 कोरोना पॉजिटिव

रामपुर, उत्तर प्रदेश : जिल्हयामध्ये कोरोना रुग्ण मिळणे सातत्याने सुरू आहे. रुग्ण आधीच्या तुलनेत कमी मिळत आहेत आणि रिकवरी दर वाढत आहे. शुक्रवारी मिळालेल्या रिपोर्ट मध्ये 26 लोकांना कोरोनाची लागण झाली. चांगली गोष्ट ही आहे की, 601 संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव आहेत, तर 45 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुख्य उपचार अधिकारी डॉ. सुबोध कुमार शर्मा यांनी सांगितले की, 14 आणि 15 सप्टेंबर ला पाठवण्यात आलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळाले आहेत, ज्यामध्ये 601 निगेटिव आणि 16 पॉजिटिव केस आहेत. एका दिवसा पूर्वी झालेल्या एंटीजन टेस्ट रिपोर्ट मध्ये 12 आणखी ट्रूनेट तपासणीत आठ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले . संक्रमितांमध्ये पाच त्रिवेणी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. पोलिस लाइन मध्येही एक रुग्ण आढळला आहे. मंसूरपुर स्वार मध्ये 4 लोक पॉजिटीव आहेत. याशिवाय शहरातील इंदिरा कॉलनी , ठोठर मुहल्ला, गायत्रीपुरम कॉलनी, जिल्हा परिषद रोड, फ्रेंडस कॉलनी या भागांमध्ये रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,464 वर पोचली आहे. यामध्ये 4,000 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 45 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या 419 सक्रिय रुग्ण आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here