राज्यात 56 साखर कारखान्यांकडून एफआरपी देणे बाकी

सोलापूर: राज्यात 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. या कारखान्यांनी गाळप केलेल्या 952.11 लाख मे. टन ऊसाचे एफआरपीनुसार 23 हजार 293.82 कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे होते. आता यंदाचा साख़ऱ हंगाम सुरु होण्यास काहीच दिवस राहिले आहेत. पण अजून मागील वर्षीची थकबकी भावगण्यात आलेली नाही. त्यातही एकट्या सोलापूर जिल्ह्यात 14 कारखान्यांकडे शेतकर्‍यांचे 151 कोटी 75 लाख 36 हजार रुपये देय आहेत.

शेतकर्‍यांचे पैसे थकवण्यात सोलापूर जिल्ह्याची आघाडी आहे. राज्याच्या एकूण 398 कोटी थकबाकीपैकी सोलापूर जिल्ह्याचीच थकबाकी 152 कोटी रुपये आहे. मागील वर्षीची शेतकर्‍यांची देणी कारखान्यांनी आजतागायत भागवलेली नाहीत. थकबाकी भागवण्याचे काम अजूनही सुरुच आहे. राज्यातील 139 साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकर्‍यांची संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली आहे. पण 56 कारखान्यांनी अद्यापही 397 कोटी 96 लाख रुपये थकवले आहेत.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मार्च एप्रिल महिन्यात एफआरपी थकविणार्‍या कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई सुरु केेली होती, मात्र साखरेचे दर घसरल्यानंतर शासनानेच साखर विक्री करुन शेतकर्‍यांचे पैसे देण्याची कारखानादारांना सवलत दिली होती.

साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, साखर कारखानदारांनी 98.38 टक्के एफआरपी दिली आहे. 1.71 टक्के एफआरपी देणे राहिले आहे. संपूर्ण एफआरपी देण्यासाठी प्रशासकीय कारवाई सुरु आहे. काही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे. शेतकर्‍यांची संपूर्ण रक्कम देण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

सोलापूर जिल्ह्यातील आदिनाथ : 2 कोटी 34 लाख, भीमा टाकळी सिकंदर : 13 कोटी 30 लाख, सिद्धेश्‍वर : 42 कोटी 32 लाख, सहकार महर्षी शंकरराव मेहिते : 11 कोटी 20 लाख, श्री विठ्ठल गुरसाळे : 5 कोटी 79 लाख, विठ्ठलराव शिंदे : 13 कोटी 43 लाख, श्री मकाई करमाळा : 7 कोटी 76 लाख, संत कूर्मदास : 4 कोटी 51 लाख, लोकनेते बाबुराव आण्णा पाटील : 7 कोटी 74 लाख, जकराया शुगर : 4 कोटी 98 लाख, युटोपियन शुगर : 2 कोटी 56 लाख, गोकुळ शुगर : 11 कोटी 98 लाख, मातोश्री लक्ष्मी शुगर : 12 कोटी 67 लाख, सीताराम महाराज खर्डी : 10 कोटी 58 लाख रुपये. आदी कारखान्यांची देणी बाकी आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here