राज्यात शेतकऱ्यांना वाहतूक, तोडणी खर्चाचा ७५० रुपयांचा भुर्दंड

पुणे : राज्यात शेतकऱ्यांना ऊस वाहतूक आणि तोडणी खर्च डोईजड झाला आहे. पूर्वी पाचशे रुपयांच्या आसपास येणारा खर्च आता ७५० रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीला कात्री लागली आहे. कारखान्यांनी वाढवलेले खर्च, वाढत्या मजुरीचा बोजा ऊस उत्पादकांवर येत आहे. सद्यस्थितीत मिळणाऱ्या एफआरपीपेक्षा वाहतूक तोडणीच डोईजड झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वैतागले आहेत.

गेल्या पाच वर्षांत उसाचा उत्पादन खर्च १५ टक्क्यांनी वाढला आहे. परंतु, सरकारकडून एफआरपीत ५० आणि १०० रुपयांची वाढ केली जाते. खर्च वाढत असताना एफआरपीत तुटपुंजी वाढ केली आहे. त्यातच साखरेचा ९.५० टक्के उतारा १०.२५ टक्क्यांवर नेला आहे. त्यामुळे वाढीचा फायदा मिळतच नाही. आता ऊस वाहतूक, तोडणीतही सातत्याने वाढ होत आहे. टोळी मुकादमाचे कमिशन, मजुरीच्या ३५ टक्के वाढीमुळे शेतकऱ्यांच्या एफआरपीतील १२० रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक कारखान्यांकडून ८५० ते ९०० रुपयांची तोडणी व वाहतूक आकारली जाते. हा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here