सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून तोडणी, वाहतूक करार सुरू

सोलापूर : नुकत्याच संपलेल्या हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिटने ११ लाख २३ हजार ९९९ मे. टन व करकंब युनिटने ३ लाख ७५ हजार ७३८ मे. टन असे एकूण १४ लाख ९९ हजार ७३७ बबनराव शिंदे मे. टन उसाचे गाळप झालेले आहे. आता कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब अशा दोन्ही युनिटने आगामी सन २०२५-२६ या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरगाडी, बैलगाडी व तोडणी मशिनचे करार सुरू केले आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.

माजी आमदार शिंदे म्हणाले की, कारखान्याने सन २०२५- २६ या हंगाम शासनाच्या धोरणानुसार सुरू करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. आगामी गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा ऊस पुरवठा होण्याच्या दृष्टीने आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करार सुरू करण्यात आले आहेत. तोडणी वाहतूक ठेकेदार व मुकादमांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क करून ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरगाडी, बैलगाडी व तोडणी मशिनचे करार करावेत. कारखान्याच्या धोरणानुसार ॲडव्हान्स वाटप करण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here