अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक, माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काळे म्हणाले की, सहवीज निर्मिती प्रकल्पातून कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. आजवर कारखान्याने ऊस दरात कधीही मागे न राहता जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर दिला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मिळणाऱ्या अधिकच्या उत्पन्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देता येईल.
आमदार काळे म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून कोळपेवाडी व परिसराचे नंदनवन झाले आहे. काळाच्या ओघात होत असलेले बदल कारखान्याने स्वीकारले आहेत. याप्रसंगी व्हाइस चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीप बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, अॅड. राहुल रोहमारे, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे उपस्थित होते. प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.