माळेगाव कारखाना रणांगण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करण्याचे आवाहन

पुणे : माळेगावकडून विक्रमी ऊस दराची परंपरा कायम ठेवायची असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवारांना ‘पॅनल टू पॅनल’ मतदान करा. मतदानात चुकीचे काम करणाऱ्या कार्य क्षेत्रातील ठराविक लोकांची मक्तेदारी मोडणार आहे, असा संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक आता निर्णायक वळणार येऊ लागली आहे. सत्ताधारी, विरोधक आपापले पॅनल जाहीर करताना सावध भूमिका घेत आहेत. अजित पवार यांनी सोमवारी (ता. २) बारामतीत राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल जाहीर करण्याअगोदर पक्षाकडे इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सहा गटनिहाय मुलाखती घेतल्या. बारामती, माळेगाव, पणदरे, सांगवी, नीरा वागज, खांडज-शिरवली या गटातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या मुलाखतींमध्ये पक्षीय अदलाबदली नको, गावकी व भावकीचे राजकारण नको, ऊस दर चांगला दिला दादा आता घराणे शाही थांबवा, उमेदवारी देताना निष्टावंतांबरोबर इच्छुकांचे वर्तन तपासा, अंहकारी संचालकांना पुन्हा संधी नको, दादा तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही स्वीकारू अशा भावना इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. पक्षाच पक्षाच्या पॅनेलबाबत पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा पॅनेल सर्व इच्छुकांची मते जाणून घेतल्याशिवाय कसे जाहीर करू. त्यामुळे माध्यमांत अथवा कार्यकर्त्यांत होत असलेल्या पॅनलमधील नावांची चर्चा निरर्थक आहे. अद्याप अधिकृत पॅनल जाहीर झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here