सातारा : साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आपण त्या पद्धतीने बदल करत आहोत. कारखाना सध्या अत्याधुनिक केला आहे. या आधुनिकीकरणामुळे कृष्णा साखर कारखाना निश्चितच एक पाऊल पुढे टाकत आहे. आगामी काही वर्षात कृष्णा कारखान्याला देशात प्रथम क्रमांकाचा कारखाना बनवण्याचा प्रयत्न करूयात, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखान्याच्या सन २०२५ – २६ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे बसविण्याच्या कामाला चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते रोलरची पूजा करण्यात आली. संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, संचालक माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. व्हाईस चेअरमन जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, दीपक पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार आदी उपस्थित होते.