पुणे : दौंड शुगर कारखान्याने यंदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड व खोडवा पिकाबाबत लागवड धोरण जाहीर केले आहे. दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कारखान्यामार्फत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करुन एकरी ऊस उत्पादन वाढ अभियान हा पथदर्शक प्रकल्प राबविणेत येईल असे जगदाळे यांनी स्पष्ट केले. याचबरोबर शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके, सहलींचे आयोजन ऊस शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणेकरिता शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळांवे, विविध प्रात्यक्षिकांचे व सहलींचे आयोजन कारखान्यामार्फत करण्यात येणार आहे.
संचालक जगदाळे यांनी सांगितले की, दौंड शुगर्सकडून आडसाली ऊस लागवड नोंद १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत, सुरु १ डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत आणि जून २०२५ मध्ये जे शेतकरी ऊस लागण करतील त्यांची लागणीची नोंद १ जुलै रोजी घेण्यात येईल. तसेच रासायनिक खते, तणनाशके, किटकनाशके, विद्राव्य खते, जैविक खते वाटप ना नफा ना तोटा या तत्वावर झुआरी ॲग्रो केमिकल्स, एक्सेल क्रॉप केअर, ॲमहापिक इंडिया फर्टिलायझर, वेदांत ॲग्रो आदी कंपन्यांची रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची विद्राव्य खते तसेच व्हिएसआयची द्रवरुप जैविक खते कारखाना कृषी सेवा केंद्रामार्फत रोखीने उपलब्ध करण्यात येत आहेत.