NFCSF तर्फे २ आणि ३ जुलै रोजी ‘को – ऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह -२०२५’चे आयोजन : अध्यक्ष हर्षवर्धन पाटील

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने २ आणि ३ जुलै २०२५ रोजी ‘को – ऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह -२०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला केंद्रीय अन्न पुरवठा व सार्वजनिक वितरण, ग्राहक व्यवहार, अपारंरपिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बांभानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हेही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारांचा वितरण सोहळाही होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे ही परिषद होणार आहे.

महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होत आहे. देशातील साखर उद्योग क्षेत्रासाठी दरवर्षी होणारी, ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण असते. महासंघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार साखर उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जातात. यानिमित्ताने साखर उद्योग प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचे ऊस विकास मंत्री अनुक्रमे लक्ष्मीनारायण चौधरी आणि शिवानंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here