देशातील साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी, उत्तर प्रदेशमध्ये हंगाम संथगतीने

कोल्हापूर : देशातील साखर हंगामाने गती घेतली आहे. देशात १५ नोव्हेंबरअखेर २४.२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यातही महाराष्ट्राने १८.७५ लाख टन साखर उत्पादनासह अव्वल स्थान राखले आहे. तर उत्तर प्रदेशचा हंगाम अतिशय धिमा सुरू आहे. राष्टीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरअखेर देशाचा साखर उतारा सरासरी ८.३३ टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १५.५७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २८ साखर कारखाने कमी सुरू आहेत. तरीही साखर उत्पादनात ८.६४ लाख टनांची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. राज्यात १५५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मागील वर्षी १६८ कारखाने सुरू होते. राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ कारखान्यांचा हंगाम बंद आहे. यंदा इतर राज्यांच्या तुलनेत हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळपही वेगात आहे. आतापर्यंत १०३.२५ लाख टन उसाचे गाळप होऊन ७.७० टक्के सरासरी उताऱ्यासह १८.७५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

मागील वर्षी याच काळात २१६.७६ लाख टन ऊस गाळप होऊन ७.९५ लाख टन साखर तयार झाली होती. महाराष्ट्रात कारखाने लवकर सुरू झाल्याने उत्पादनात मोठी आघाडी दिसत आहे. उत्तर प्रदेशात ७५ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. मागील वर्षी ८६ कारखाने सुरू होते. यंदा १७.३४ लाख टन ऊस गाळपातून ८.६५ टक्के उताऱ्यासह १.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर कर्नाटकात ६० कारखाने सुरू झाले असून, ३४.५१ लाख टन ऊस गाळपातून ७.०० टक्के उताऱ्यासह २.२० लाख टन साखर उत्पादन झाले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here