‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

डोमेस्टिक मार्केट: आज देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०४५ ते ३१०० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१८० ते ३३१० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३२१० ते ३३३५ रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१०० ते ३१४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३१५० ते ३२०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज शांत राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३१४.१० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.७६ सेंट्स मध्ये झाला.

ChiniMandi WhatsApp Channel

कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.
एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६८.८९ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.७६ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९३२ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५७.०९ डॉलर होते.

इक्विटी : बीएसई ३०, सेंसेक्स ३१८ अंकांनी घसरून ३८८९७ अंकांवर तर एनएसई निफ्टी ९० अंकांनी घसरून ११५९६ अंकांवर बंद झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here