सोलापूर : सहकार महर्षी कारखाना कर्जमुक्त झाल्याची आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची माहिती

सोलापूर : शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ६५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेपुढे मांडण्यात आलेल्या सर्व १३ विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली. यावेळी सरकारने सहा वर्षांपूर्वी, २०१९ मध्ये साखरेचा ३१०० रुपये दर ठरवून दिला होता. आता हा दर वाढवून ४१०० रुपये करावा. इथेनोलच्या दरात ६ ते ७ रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी सगळ्यांकडून होत आहे, असे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. सहकार महर्षी कारखाना आता कर्जमुक्त झालेला आहे. त्यामुळे आपण यावेळी जिल्ह्यात सर्वाधिक दर देणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते -पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, गळीत हंगामाच्या काळात दराची स्पर्धा सुरू होऊन ऊस पळवा पळवी वाढीस लागलेली आहे. त्यामुळे सभासदांनी पूर्ण क्षमतेने या कारखान्याला आपला ऊस घालावा. यावेळी गत हंगामात ऊसाचे दर्जेदार उत्पादन घेतलेल्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here