महाराष्ट्र : ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्याची सक्ती

लातूर : राज्यात सध्या ऊसतोड हंगाम सुरू आहे. त्यामुळे गावोगावी लहानमोठ्या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, ट्रेलर व बैलगाड्यांच्या माध्यमातून उसाची वाहतूक सुरू आहे. या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून या वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) दिली. कारखान्यांनी त्यांच्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व बैलगाड्यांवर रिफ्लेक्टर बसविल्याची खात्री करून ऊस वाहतुकीला परवानगी द्यावी. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी कापडी रिफ्लेक्टीव्ह बोर्ड छापून संबंधित वाहनधारकांना वितरित करावेत व त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अनेक वाहने रात्रीच्या वेळी उसाची वाहतूक करतात. मात्र, वाहनांना रिफ्लेक्टर टेप नसल्यामुळे अपघात होतात. सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टीव्ह टेप लावणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनाही यावर लक्ष ठेवावे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन रस्ता सुरक्षा उद्दिष्ट साध्य होईल, असेही कारखान्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये आरटीओंनी नमुद केले आहे. रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविल्याशिवाय रस्त्यावर वाहतूक करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here