अहिल्यानगर : गौरी शुगरचा उसाला ३२०० रुपये भाव; पहिला हप्ता ३१०० रुपये

अहिल्यानगर : हिरडगाव येथील गौरी शुगरने चालू गाळपात दोन लाख मे. टन गाळपाचा टप्पा पार केला असून देवदैठण येथील युनिट सुरु आले आहे. गौरी शुगरचे करण्यात दहा लाख मे. टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या हंगामासाठी गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रु ने भाव देणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३१०० रुपयांनी काढणार आहे, अशी माहिती ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे.

बोत्रे-पाटील म्हणाले की, आमची कुणाशीही कसलीच स्पर्धा नाही, फक्त शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे धोरण आहे. दिवाळीला मोफत साखर दिली होती. यंदा साखर कामगारांना २० टक्क्यांनी पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला. हा आर्थिक भार सहन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हीत विचारात घेऊन गौरी शुगरने पहिला हप्ता ३१०० रुपयांनी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीला १०० रु आणि ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here