सातारा : अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज दिशादर्शक असल्याचे पंकजकुमार बन्सल यांचे मत

सातारा : नवी दिल्लीच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक आणि सहकार मंत्रालयाचे अॅडिशनल सेक्रेटरी पंकजकुमार बन्सल यांनी नुकतीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. त्यांनी कारखान्याच्या कामकाजाची पाहणी केली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बन्सल यांच्या पत्नी उपस्थित होत्या. राज्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांसाठी अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

बन्सल यांनी कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन वाढवण्यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करावा, त्याचप्रमाणे साखर उत्पादना बरोबरच उपपदार्थ प्रकल्पांच्या क्षमता वाढवाव्या, आणि सीबीजी प्रकल्प हाती घ्यावेत, केमिकल्स उत्पादन करावे, अशा सूचना केल्या. जिल्हाधिकारी संतोष पाटील, एनसीडीसी पुण्याचे रिजनल डायरेक्टर गिरराज अग्निहोत्री, डायरेक्टर पुनीत गुप्ता आणि गणेश गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड, जिल्हा निबंधक संजय सुद्रिक, कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, संचालक सर्जेराव सावंत, रामचंद्र जगदाळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांसह अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here