अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड

अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेश कोंडीराम मगर तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब वसंत पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहायक निबंधक अधिकारी राजेंद्र राहणे होते. अध्यक्ष पदासाठी मगर यांचे नाव संचालक विलास कहांडळ यांनी सूचवले. त्यास सुदाम उगलमुगले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी अण्णासाहेब पगारे यांचे नाव संचालक साईनाथ तिपायले यांनी सूचवले. त्यास केशव बटवाल यांनी अनुमोदन दिले.

निवडीनंतर नूतन अध्यक्ष सुरेश मगर म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पंचक्रोशीतील उस उत्पादक सभासदांच्या उत्कर्षासाठी साखर कारखान्याची उभारणी केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी साखर कामगारांच्या अडी अडचणी समजून घेत त्यांची सोडवणूक केली आहे. तर उपाध्यक्ष आण्णासाहेब पगारे यांनी सर्वांच्या सहकार्यातून युवानेते कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कामगार पतपेढीचा कारभार आदर्शवत करू, असे सांगितले. यावेळी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी अध्यक्ष उत्तमराव शेळके, माजी उपाध्यक्ष सुभाष होन यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक सुहास यादव, शिवाजीराव दिवटे, रंगनाथ लोंढे, देवराम देवकर, सुभाष होन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here