जालना : श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची तपासणी, सर्व वजन काटे अचूक

जालना : भोकरदन तालुक्यातील रावसाहेबनगर, सिपोरा (बाजार) येथील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या.च्या वजन काट्यांची शासनाच्या भरारी पथकाने शेतकरी संघटनेच्या उपस्थितीत शनिवारी अचानक तपासणी केली. यावेळी कारखान्याचे सर्व वजन काटे अचूक आणि तंतोतंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. शनिवारी दुपारी निरीक्षक वैद्यमापन शास्त्र विभाग, तहसील कार्यालय आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी कारखान्यास अचानक भेट दिली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात वजनाबाबत कोणतीही शंका राहू नये, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली. हा काटा अचूक असल्याचे प्रमाणपत्र पथकाकडून देण्यात आले. या पथकात वैद्यमापन शास्त्र निरीक्षक एस. एन. वाघ, तलाठी अंकुश बावस्कर, विशेष लेखा परीक्षक अशोक जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष काकासाहेब साबळे यांचा सहभाग होता. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एकनाथ कोलते, जनरल मॅनेजर प्रमोद दिसले, शेतकी अधिकारी सतीश डावखर, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, मुख्य लेखापाल कुदळे, कृष्णा गिरणारे, एच. आर. मॅनेजर घाडगे, सुरज पवार यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here