पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बिनविरोध

पुणे : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखानाच्या संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदार संघ संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची आज बिनविरोध निवड झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. ही निवड प्रक्रिया प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जावर ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. तर संचालक तानाजी कोकरे यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. अध्यक्षपदाच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. २४ जून २०२५ रोजी झालेल्या २०२५-२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीत, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला, तर विरोधी पॅनलने फक्त एक जागा जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here