सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध, लवकरच अधिकृत घोषणा

सोलापूर : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ संचालकांच्या जागेसाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. यातील दोन अर्ज बबनराव शिंदे यांना पूरक म्हणून भरले गेले आहेत. त्यामुळे सर्व २१ संचालकांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झालेली आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची १८ फेब्रुवारी होती. अर्जाची छाननी १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २० फेब्रुवारी अर्ज माघारी घेणे आहेत व त्यादिवशी सर्व पात्र उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध होणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माढा विभागाच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड काम पाहत आहेत.

कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक मंडळाच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. यंदाही तीच परंपरा कायम राखली जाईल असे दिसते. जिल्हा दूधसंघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक पार पडली आहे. संचालक मंडळात काही जुन्या तर काही नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये बबनराव शिंदे, पोपट गायकवाड, पोपट चव्हाण, अमोल चव्हाण, विक्रमसिंह शिंदे, पंडितराव पाटील, विलास कौलगे, नीलकंठ पाटील, अशोक मिस्कीन, विलास तोडकरी, सचिन देशमुख, रमेश येवले-पाटील, राजेश खोत, संजय लोकरे, श्रीकांत पाटील, रणजितसिंह शिंदे, लाला मोरे, राजाराम थोरात, राजाराम नाळे, सुशीला चौगुले, निलावती घाडगे, जितेंद्र गायकवाड, सिंधुताई नागटिळक यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here