नवी दिल्ली: भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटना (ISMA) ने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेतलेल्या आढाव्यानंतर २०२५-२६ साखर हंगामासाठी (SS २०२५-२६) साखर उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.
ऊस क्षेत्राचे उपग्रह आधारित मूल्यांकन…
‘इस्मा’ने देशभरातील ऊस पिकाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा खरेदी केल्या. उपग्रह प्रतिमांनी स्पष्ट आणि विश्वासार्ह अंदाज दिला. त्याचबरोबर प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, मागील उत्पादन ट्रेंड, सध्याची हवामान परिस्थिती, सध्याचे उत्पादन, साखर रिकवरी आकडेवारी आणि उर्वरित गाळप हंगामातील अंदाजित कामगिरीचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यनिहाय निरीक्षणे…
समितीने असे निरीक्षण नोंदवले की, उत्तर प्रदेशात उसाचे उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात रोगग्रस्त ऊस प्रजाती हटवून सुधारित प्रजातीच्या उसाची लागवड करण्यासाठी सुरू असलेला कार्यक्रम आहे, ज्यामुळे उत्पादकता पातळीवर तात्पुरता परिणाम झाला आहे. तथापि, राज्यात साखरेचा उतारा मागील हंगामांपेक्षा जास्त असल्याचे नोंदवले गेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक प्रदेशांमध्ये, साखरेचा उतारा चांगली असूनही उसाचे उत्पादन कमी झाले आले. उत्पादनातील ही घट ऊस लवकर परिपक्व होण्याशी संबंधित आहे. जानेवारी महिन्यातच उसाला तुरे आले होते.त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर पाहायला मिळत आहे.
२०२५-२६ च्या एसएससाठी सुधारित उत्पादन अंदाज…
एकूण साखर उत्पादन: ३२.४ दशलक्ष टन
इथेनॉलसाठी अंदाजे साखर वापर: ३.१ दशलक्ष टन
निव्वळ साखर उत्पादन: २९.३ दशलक्ष टन (गेल्या वर्षीच्या तुलनेत १२% जास्त)
















