कोल्हापूर : दालमिया शुगर्सचे सीईओ रुस्तोगी यांच्याकडून ऊस पिकाची पाहणी

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याच्या एटीपीतून प्रक्रिया केलेल्या पाणी योजनेद्वारे पडवळवाडी (ता. करवीर) येथील ४० एकरातील कोरडवाहू जमीन मोफत देऊन तेथे ऊस पिकाची लागवड केली आहे. दालमियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज रुस्तोगी आणि युनिट हेड संतोष कुंभार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पाहणी केली. दालमिया येथील शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून सवलतीच्या दरात ऊस बियाणे, तीन हजारपर्यंत खते, मोफत पुरेसे पाणी आणि तज्ज्ञाचे मार्गदर्शन देऊन शेती पिकविण्यासाठी मदत करत आहे.

सूतगिरणी नावाच्या शिवारात पन्नास एकराहून अधिक शेती पाण्याअभावी पडून होती. तेथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युनिट हेड संतोष कुंभार यांनी शेतकऱ्यांना यावर्षापासून एटीपीतून प्रक्रिया करून निघाणारे पाणी, योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत मोफत दिले आहे. पीक पाहणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज रस्तोगीसह युनिट हेड संतोष कुंभार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रोजेक्ट हेड नीरज बन्सल, शेती अधिकारी श्रीधर गोसावी, सिनियर मॅनेजर शिवप्रसाद देसाई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शेती शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे, किशोर लेंगरे, सागर पोवार, पांडुरंग पाटील, विजय नलवडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here