लातूर : विलास साखर कारखान्याने जपले सामाजिक भान, वृक्षारोपणासह सामाजिक उपक्रमांना पाठबळ

लातूर : वैशालीनगर (निवळी) येथील विलास सहकारी साखर कारखान्याचा स्थापना दिन आणि राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेसचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण कार्यक्रम विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना लि. चे माजी चेअरमन धनंजय देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, माजी आमदार, व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे यांच्यासह आजी-माजी संचालकांच्या उपस्थितीत झाला.

कारखाना स्थापना दिनाचे औचित्य साधून गायिका वंदना कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘भावसंध्या’ या कार्यक्रमात रसिक चिंब झाले. गायिका वंदना यांनी उत्कटपणे कार्यक्रम सादर केला. त्यांनी सादर केलेल्या भक्तीगिताने रसिक भक्तीरसांत न्हावून निघाले. कांबळे यांनी भावगीतेही सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, नितीन पाटील, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दिपक बनसोडे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here