पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने वन-अग्निमुक्त दिनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शनिवारी वन-अग्निमुक्त दिनानिमित्त वनविभागाच्यावतीने अग्निमुक्ती शपथविधीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वणव्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत जागरूक करण्यात आले. जुन्नर वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात यावेळी भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, अधिकारी अनिल बोंबले, दिनकर आदक, सुरेश शिंदे, किरण शिंदे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे तसेच वनविभागाचे धामणी बीट वन परिमंडल अधिकारी निलम चव्हाण, वनरक्षक पूजा कांबळे, योगेश निघोट आदी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात जंगलांचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला. वने ही आपली नैसर्गिक संपत्ती असून, ती पाणी, माती, हवामान, वन्यजीव आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे संरक्षण करतात. निसर्गाने अनेक वर्षांच्या प्रयत्नातून निर्माण केलेली ही संपत्ती वणवा काही तासांत नष्ट करू शकतो, याची जाणीव करून देण्यात आली. यावेळी सुनील कालेकर, शांताराम जाधव, अजित चिखले, नारायण टेमकर, नामदेव रिठे, सुनील टेमकर, अनिल वळसे पाटील, बाळशिराम शिंदे, दीपक वळसे पाटील, रोहिदास भागवत आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here