सांगली : जिल्ह्यात ऊस बिले थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

सांगली : जिल्ह्यातील ऊस उत्पादन एकरी ६० ते ७० टनावरून घसरून अनेक भागात २५ ते ३० टनावर आले आहे. वाढती महागाई, उत्पादन खर्चातील प्रचंड वाढ, पिकांना न मिळणारा योग्य दर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्च लाखांच्या घरात गेला असताना ऊस बिलेही थकली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. साखर कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस बिले द्यावीत, अशी मागणी होत आहे.

राज्यभरात ४ हजार कोटी रुपयांची ऊस बिलांची थकबाकी असल्याचे चित्र आहे. ऊस बील देण्यास उशीर झाल्यास १५ टक्के व्याज देण्याची तरतूद असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. उत्पादन खर्च वाढला असून ऊसबिले थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.शेतकऱ्यांच्या मते, शासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here