पुणे : उच्चांकी १२ लाख ९८ हजार मे. टन ऊस गाळप करून ‘सोमेश्वर’च्या हंगामाची यशस्वी सांगता

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरुवात झाली होती. गेले १४३ दिवस चाललेल्या या गळीत हंगामाची सोमवारी, दि. २३ रोजी यशस्वी सांगता झआली. सोमवारी रात्री गव्हाणीत नारळ टाकून पारंपरिक पद्धतीने हंगामाची सांगता करण्यात आली. ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक सुनील भगत, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांच्यासह अधिकारी व ऊसतोडणी कामगार उपस्थित होते. कारखान्याने उच्चांकी १२ लाख ९८ हजार टन ऊसगाळपाची नोंद केली. गाळप, साखर उत्पादन आणि साखर उताऱ्यात कारखाना जिल्ह्यात अव्वल राहिला. कारखान्याने १५ लाख ५५ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले. याशिवाय ११.९८ टक्के साखर उतारा राखत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत वर्चस्व कायम राखले आहे.

हंगामात बबन नारायण भिलारे व जनाबाई बबन भिलारे या जोडप्याने ६०० टन ऊसतोड करून प्रथम क्रमांक मिळविला. अनिल बबन भोसले यांनी ५३३ व दिलीप रोहिदास भोसले यांनी ५२० टन ऊस या हंगामात तोडला. हंगाम संपल्याच्या आनंदात ऊसतोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळ, अधिकारी, कामगार, सभासद, तोडणी कामगार व वाहतूकदार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हंगामाची यशस्वी सांगता झाली. हंगाम यशस्वी करण्यासाठी मुकादम सचिन माने, रघुनाथ चव्हाण, दिलीप भोसले, नाना भोसले आणि दादासो अर्जुन माने यांनी परिश्रम घेतले. तसेच गाडीवान गणेश माने, भाऊसाहे मोरे, दिलीप भोसले, नितीन चव्हाण आणि अशोक जगदाळे यांनी वाहतुकीची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here