महाराष्ट्र : ऊस उत्पादकतेत महाराष्ट्राची देशात भरारी, मिळतेय हेक्टरी ८८ टन उत्पादन

सोलापूर : राज्य शासनाच्या अर्थ विभागाने नुकतेच विधानसभेतच्या पटलावर सन २०२६ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यामधील माहितीनुसार, ऊस पिकाच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेत महाराष्ट्र अग्रेसर असून, तो ८८ टन इतका आहे. सन २०२४-२५ या वर्षातील आकडेवारी मांडण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ गुजरात आणि कर्नाटकातही ऊस पिक महत्वाचे आहे. तर सर्वात कमी उत्पादकता ही अरुणाचल प्रदेशात २२ टन इतकी आहे. देशातील अनेक राज्यांची आर्थिक सक्षमता ही ऊस पिकांमुळे वाढली असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

कर्नाटकात प्रति हेक्टरी ऊस उत्पादकता ही ८५ टन असून, गुजरातमध्ये ५८ टन इतकी आहे. या आर्थिक पाहणी अहवालानुसार दरडोई जनावरांच्या संख्येत देशात अरुणाचल प्रदेश अग्रेसर असून, ७६.८६ इतकी जनावरांची संख्या आहे. महाराष्ट्रात मात्र, घटती जनावरांची संख्या चिंताजनक आहे. प्रगत महाराष्ट्रात प्रति डोई जनावरांची तुलनेने कमी, २६.९३ इतकी जनावरांची संख्या आहे. याऊलटकर्नाटकात ४३. ८९ तर मध्यप्रदेशात ४९.०२, आंध्रप्रदेशात ६५.०३, गुजरातमध्ये ३९. २७ इतकी दरडोई जनावरांची संख्या आहे. आर्थिक पाहणीनुसार देशात सर्वाधिक प्रति व्यक्ती दुध उलब्धतेत गुजरात पुढे आहे. गुजरातमध्ये प्रति व्यक्तीसाठी ७३० मिलिग्रॅम दूध उपलब्धता आहे. त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशमध्ये ७१६ मिलिग्रॅम, महाराष्ट्रात ३५८ मिली ग्रॅम, मध्यप्रदेशात ७०७, कर्नाटकात ५५९ मिलिग्रॅम दुधाची उपलब्धता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here