सांगली: आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला ऊसतोड मजूर आणि ऊस वाहतूक यंत्रणा पुरवण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत बीड जिल्ह्यातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, ७ जुलै २०२५ ते आजअखेर हा प्रकार घडला. याप्रकरणी कारखान्याचे शेती अधिकारी परशुराम आनंदा चव्हाण (तुरची ता, तासगाव) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीनुसार रंगनाथ ज्ञानोबा आंधळे, राधाबाई रंगनाथ आंधळे, विकास बारीकराव सारूक (तिघेही आंधळेवाडी ता. केज जि. बीड), बाबूराव मधुकर ठोंबरे (रा. धोतरा सरणी, सांगवी, ता. केज) आणि बाबू राजाराम आहे. हांगे (रा. रामेश्वरवाडी ता. केज जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


















