हिंगोली : टोकाई सहकारी साखर कारखान्यातील भंगाराची परस्पर विक्री केल्याचा सभासदांचा आरोप

हिंगोली : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्यातील भंगार परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साखर कारखान्याच्या भंगार विक्रीसंदर्भात संचालकांची बैठक किंवा भंगार विक्री टेंडर प्रक्रिया न करता ही विक्री झाल्याचा आरोप शेतकरी, सभासद करत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रादेशिक सहसंचालकांना २५ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. कारखान्याची संपत्तीची अशी उघड लूट होत असताना जबाबदार अधिकारी आणि संचालक गप्प का? असा सवाल केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रादेशिक सहसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष व एम.डी. यांच्याशी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता. कारखान्याच्या एम.डीं.नी कॉलला प्रतिसाद दिला नाही. कारखान्याच्या व्हाइस चेअरमननी या संदर्भात माहिती दिली आहे. हे भंगार कारखान्याचे अध्यक्ष यांनी परस्पर विक्री केली असल्याचे पुढे आले आहे. कारखान्याचे काही देणे बाकी असल्याने हे भंगार विक्री करुन ती देणी दिली जाती,ल असे सांगण्यात आले आहे. मात्र, परस्पर भंगार विक्रीचा खटाटोप नेमका कशासाठी केला हा प्रश्न शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here