नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या कादवा कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी गोटीराम वाळके, अजित कड यांची निवड झाली. नवनिर्वाचित तज्ज्ञ संचालकांचा सत्कार राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झाला. मंत्री झिरवाळ म्हणाले, कादवा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक गोटीराम वाळके व अजित कड यांना त्यांच्या कामाची पावती मिळाली आहे. सर्वच निवड झालेल्या तज्ज्ञ संचालकांनी कादवा कारखान्याच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले कि, कारखाना व्यवस्थापन आणि संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करावे. दरम्यान, वणी गटातील ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे वाळके, कड यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, शिवाजी सातपुते, गंगाधर पवार, कैलास वाळके, रघुनाथ सातपुते, बाळासाहेब गटकळ, पप्पू वाळके आदी उपस्थित होते.


















